Shruti Haasan : श्रुती हसनचा ग्लॅम लूक; साडीत दिसतेय फारच सुंदर!
अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच ती मॉडेल, संगीतकार आणि लेखिका देखील आहे. श्रुतीने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली.
(pc:shrutzhaasan/iig)
1/10
दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने खळबळ माजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन. (pc:shrutzhaasan/iig)
2/10
अभिनेत्रीचा जन्म 28 जानेवारी 1986 रोजी झाला. कमल हसन आणि सारिका ठाकूर यांची मुलगी श्रुती खूप प्रतिभावान आहे. अभिनयासोबत ती गातेही.(pc:shrutzhaasan/iig)
3/10
वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी श्रुतीने तिचे वडील कमल हसन यांच्या ‘चाची ४२०’ या चित्रपटात पहिल्यांदा गाणे गायले होते. (pc:shrutzhaasan/iig)
4/10
अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच ती मॉडेल, संगीतकार आणि लेखिका देखील आहे. श्रुतीने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली.
5/10
एवढेच नाही तर श्रुतीला अनेक भाषाही अवगत आहेत. तिला हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड उत्तम बोलता येते. (pc:shrutzhaasan/iig)
6/10
श्रुती हसनने चेन्नईच्या लेडी अंडाल स्कूलमधून तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात अभिनेत्रीने तिचे नाव बदलले. याचे कारण तिला तिची ओळख लपवायची होती. त्यामुळे तिने आपले नाव बदलून आपले नवे नाव पूजा रामचंद्रन ठेवले.(pc:shrutzhaasan/iig)
7/10
'लक' या चित्रपटातून या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'गब्बर सिंह', 'बालुपू', 'रेस गुर्रम', 'श्रीमंथुडू', 'प्रेम' आणि 'क्रॅक' सारख्या चित्रपटात दिसली. (pc:shrutzhaasan/iig)
8/10
नुकताच श्रुतीने तिचा एक खास लूक शेअर केला आहे. (pc:shrutzhaasan/iig)
9/10
यात श्रुती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
10/10
सोशल मीडियावर तिचा हा लूक व्हायरल होत आहे.
Published at : 05 Apr 2024 05:01 PM (IST)