बापावर झालेल्या हल्ल्यानंतर मुलं हळहळली; सारा, इब्राहिमची तात्काळ रुग्णालयात धाव
Actor Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ अली खानच्या राहत्या घरी चोराने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर तो जखमी झाला.
जखमी सैफला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर आता सैफ अली खानची मुलही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान त्याला भेटण्यासाठी लीलावली रुग्णालयात पोहोचले आहेत.
बुधवारी 15 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झाल्यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हापासून करीना कपूर त्याच्यासोबत रुग्णालयात आहे.
आता सारा आणि इब्राहिम, वडील सैफला भेटून करिना कपूरला धीर देण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
सैफ अली खानच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. सैफच्या घरातील 3 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
सॅफ अली खानच्या इमारतीतील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरु आहे. याशिवाय इमारतीतील इतर कामासाठी आलेल्या मजुरांचाही तपास सुरु आहे.