Rajkummar Rao : कधी खिशात होते फक्त 18 रुपये, आज आहे कोट्यवधींचा मालक; अभिनेता राजकुमार रावची एकूण संपत्ती किती?
Rajkummar Rao Net Worth : एक वेळ अशी होती जेव्हा आज कोट्यवधींचा मालक असलेल्या राजकुमार रावच्या खिशात फक्त 18 रुपये होते, आज तो कोट्यवधींचा मालक आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHappy Birthday Rajkummar Rao : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैंकी एक अभिनेता राजकुमार राव याचा आज 31 ऑगस्ट रोजी 40 वा वाढदिवस आहे. (PC:PTI)
राजकुमार राव याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आज प्रसिद्धी मिळवली असली तरी, एक वेळ अशी होती, जेव्हा त्याच्या बँक अकाऊंटवर फक्त 18 रुपये होते. (PC:PTI)
राजकुमार राव याने आपल्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. राजकुमार सध्या इंडस्टीमधील प्रसिद्धी अभिनेता असण्यासोबतच कोट्यवधींचा मालकही आहे. (PC:PTI)
सध्या राजकुमार राव आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2' द्वारे प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. (PC:PTI)
राजकुमारचा जन्म हरियाणामधील गुरगाव येथे झाला. त्याचे वडील सत्य प्रकाश यादव आणि आई कमलेश यादव. राजकुमार याचं मूळ नाव राजकुमार यादव आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, राव ही यादवांना दिलेली पदवी आहे, म्हणून त्याने हे नाव वापरायला सुरुवात केली. (PC:PTI)
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत अभिनयात नशीब आजमवायला आलेल्या राजकुमार रावकडे तेव्हा पैसे नव्हते आणि राहण्याचंही ठिकाण नव्हतं. त्याने फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियामधून (FTII) एक्टिंग कोर्स पूर्ण केला. (PC:PTI)
हाती पैसे आणि काम नसल्यामुळे राजकुमार कधी पार्ले-जी बिस्कीट तर कधी फ्रुटी पिऊन दिवस ढकलायचा. ऑडिशनसाठी दारोदारी भटकल्यानंतर त्याला जाहिरातींमध्ये काम मिळालं. त्याने चित्रपटांसाठीही अनेक ऑडिशन दिली. त्यानंतर 2010 साली त्याला संधी मिळाली. (PC:PTI)
दिवाकर बॅनर्जी यांच्या 'लव, सेक्स और धोखा' चित्रपटातून राजकुमार रावने 2010 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट केले. राजकुमार रावने आतापर्यंतच्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये 30 हू अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांना योग्य न्याय दिला आहे. (PC:PTI)
राजकुमार रावला खरी प्रसिद्धी 2013 मध्ये आलेल्या 'काय पो छे' चित्रपटातून मिळाली. यानंतर राजकुमारने मागे वळून पाहिलं नाही. (PC:PTI)
राजकुमार राव याने क्वीन, बरेली की बर्फी आणि हम दो हमारे दो, मिसेस अँड मिस्टर माही, अलीगढ, लुडो, छलांग यासह अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. (PC:PTI)
जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, अभिनेता राजकुमार राव याची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार एका चित्रपटासाठी सुमारे 6 कोटी रुपये फी आकारतो. (PC:PTI)