Raghav Chadha, Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी शेअर केले खास फोटो; रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
परिणीती आणि राघव यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
परिणीतीनं तिच्या आणि राघव यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'आम्ही एकदा नाश्ता एकत्र केला. त्यानंतर मला माहित झाले की मी योग्य व्यक्तीला भेटले आहे. तो सर्वात अद्भुत माणूस ज्याचा स्वभाव शांत आणि प्रेरणादायक आहे. त्याचा पाठिंबा, विनोद बुद्धी आणि मैत्री ही निखळ आनंद देणारी आहे.'
पुढे परिणीतीनं पोस्टमध्ये लिहिलं, आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती. हे स्वप्न प्रेम, आनंद, भावना आणि डान्स या गोष्टींनी सुंदरपणे फुलणारे होते.''
परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला.
राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु होती.
आता परिणीती आणि राघव हे लग्न कधी करणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
सोशल मीडियावर परिणीती आणि राघवला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला प्रियांका चोप्रानं देखील हजेरी लावली.