Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vedaant Madhavan: कौतुकास्पद! आर.माधवनच्या लेकानं पटकावले सात मेडल्स, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
मध्य प्रदेशात पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर. माधवनचा मुलगा वेदांत माधवननं 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पटकावली आहेत
आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं अनुराग ठाकुर यांच्यासोबत अनेकांचे आभार मानले.
आर. माधवननं ट्विटरवर वेदांतचे स्पर्धेतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन त्यानं लिहिलं, 'देवाच्या कृपेने 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटर स्पर्धेत त्याला सुवर्णपदक, 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये त्याला रौप्यपदक मिळालं आहे.'
आर, माधवनचा मुलगा वेदांत माधवनचे खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेतील काही फोटो शेअर केले आहेत.
अपेक्षा फर्नांडीसनं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये 6 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकं पटकावली आहेत, तर वेदांतनं या स्पर्धेत एकूण सात मेडल्स पटकावले आहेत.
आर. माधवननं आणखी एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं वेदांतचे स्पर्धेतील काही फोटो शेअर केले आहेत.
आर. माधवन हा वेदांतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.