Hug Day 2023 : एक मिठी दूर पळवी सारी भीती...; मिठीचे आश्चर्यकारक फायदे पाहा
प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे दुसरे सुख नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो.
जोडीदाराला रोज मिठी मारल्याने तणाव कमी होण्याबरोबरच चिंता देखील कमी होते.
जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात.
तुम्हाला जर कधी जास्त तणाव जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारू शकता.
तुम्हाला माहित नसेल पण, 10 मिनिटे हात धरण्यापासून ते 20 सेकंद मिठी मारण्यापर्यंत तुमच्या रक्तदाबाची पातळी कमी होते.
जर तुम्हाला वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात अनेक हार्मोन्स तयार होतात.
एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीतीही खूप कमी होते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.