Bollywood: प्रियंका चोप्राची मुलगी मालती मेरी तिच्या आजीची आहे लाडकी, 'या' फोटोंमधून दिसून येतो जिव्हाळा...
प्रियांका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेत राहत आहे. त्याचवेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा देखील तिच्यासोबत आहे, जी तिच्या नातीसोबत दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका तिची मुलगी मालतीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. बहुतेक फोटोमध्ये ती तिच्या मुलीचा चेहरा दाखवणं टाळते. यावेळी प्रियांकाने मालतीचे आणि मधु चोप्राचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
प्रियंका चोप्राची मुलगी मालती मेरी चोप्रा-जोनास तिची आजी मधु चोप्रासोबत खूप वेळ घालवताना दिसत आहे. मालतीला तिच्या आजीसोबत खूप छान वाटतं.
प्रियांकाने एकदा तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रियांका चोप्रा जेव्हा कामानिमित्त बाहेर जाते, तेव्हा तिची आई मधु चोप्रा मालतीची काळजी घेते. अशा परिस्थितीत मालतीचे तिच्या आजीसोबतचे बॉन्डिंग किती आहे याचा अंदाज लावता येतो.
मधु चोप्रा सहसा मालतीसोबतचे तिचे फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये ती तिच्या नातीसोबत मौल्यवान वेळ घालवताना दिसत असते.
मालती बर्याचदा तिच्या आजीच्या मांडीवर दिसते आणि या दरम्यान तिचा हसरा चेहरा दर्शवतो की, केवळ तिची आजीच नाही, तर ती स्वतः देखील तिच्या आजीचा सहवास खूप एन्जॉय करते.
प्रियंका चोप्राची मुलगी मालती ही तिच्या आजीची खूप लाडकी आहे.