PHOTO : अलिया उगाच प्रसिद्ध नाही, तिच्या या दमदार अभिनयावर एक नजर टाका...
'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून पदार्पण केलेली अभिनेत्री आज बॉलीवूडमधील दिग्दर्शकांची पहिली निवड बनली आहे. आज आलिया भट्टचे नाव बॉलीवूडमधील सर्वात कमी वयात कित्येक हिट सिनेमे देणाऱ्या यादीत समाविष्ट झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु आलिया ही रातोरात प्रसिद्ध झाली नाही. त्यामागे तिचे असलेले माप परिश्रम तसेच तिला मिळालेले दमदार रोल देखील कारणीभूत आहेत. 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमात आलियाची खंबीर तरुणीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली.
'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमात आलियाने दमदार रोल साकारला आणि हा सिनेमासुद्धा हिट झाला.
चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित' 2 स्टेस्टस' या सिनेमातील आलियाच्या रोलचे दर्शकांनी कौतुक केले.
2014 साली रणदीप हुड्डासोबत आलेल्या 'हायवे' सिनेमामध्ये दमदार अभिनयाचे प्रदर्शन करून आलियाने सर्व दर्शकांना चक्कीत केले आहे.
मेघना गुलजार यांच्या' राझी' या सिनेमात आलियाने गुप्तहेराचा अभिनय करुन उत्तम अभिनयाचे प्रदर्शन केले होते.
काही दिवसांपूर्वी रीलिज झालेल्या संजय लीला भंसाली यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमात आलियाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.