Photo: रश्मिकाने चुकून तिच्या चाहत्याला प्रपोज केलं.. नंतर हे घडलं...
कोणी आपल्याला प्रपोज केलं, तू खूप आवडतो किंवा आवडते असं जर म्हणालं तर आपल्याला काय वाटेल? आनंदी वाटणारा आणि मनाला हुरळून लावणारा हा क्षण. पण जर प्रपोज करणारी व्यक्ती जर देशातील तरुणांची क्रश असलेली रश्मिका मंदाना असेल तर?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मिका मंदानाने तिच्या एका चाहत्याला चुकून प्रपोज केलं आणि तो चाहता चांगलाच खुलला. यासंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रश्मिका तिच्या चाहत्यासोबत संवाद साधत होती. त्यावेळी त्या चाहत्याने तिला तेलुगु भाषेत मुलींना कसं प्रपोज करायचं असा प्रश्न विचारला.
त्यानंतर रश्मिकाने त्याची फिरकी घेत कोण आहे ती मुलगी असा प्रश्न विचारला. रश्मिका तेलुगु भाषेत 'नवू चाला मंचिगा कानिस्पीस्तान्नूव' म्हणजेच तू खुप छान दिसते असं म्हणाली.
हे वाक्य उद्गारताच त्या चाहत्याने लगेचच सेम टू यू असे उत्तर दिले. ते उत्तर ऐकल्यावर रश्मिका अचंबित होऊन हसत हसत पुढे निघून गेली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 86,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला असून त्यावर जवळपास आठ हजाराहून जास्त लाईक्स आले आहेत.
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केली असून एका चाहत्याने तर 'सही खेल गया भाई' अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने 'नवू चाला मंचिगा कानीस्पीस्तान्नूव' याचा अर्थ आय लव्ह यू असा नसून तू खुप छान दिसते असा होतो असं स्पष्ट केलंय.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने देशभरातील तरुणांना तिच्या मनमोहक सौंदर्याने प्रेमात वेडं केलं आहे. खासकरून पुष्पा या चित्रपटातील तिच्या भूमिकेनंतर ती चांगलीच चर्चेत आली आणि बघता-बघता नॅशनल क्रश बनली. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते आतुरलेले असतात.
रश्मिका तिच्या हटके फॅशन सेन्स आणि दमदार अभिनय कौशल्याने ओळखली जाते. तिने आत्तापर्यंत तेलूगू (Telugu), तामिळ (Tamil),कन्नड (Kannada),हिंदी (Hindi)अशा अनेक भाषांतील चित्रपटात काम केले आहे.
नुकतंच रश्मिकाचा सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा (Sidharth Malhotra) मिशन मजनू (Mission Majnu) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे.