In Pics : अर्जुन-मलायका, आलिया-रणबीर...बॉलिवूडच्या 'या' जोड्यांचं यंदा 'शुभमंगल सावधान'?
रणबीर-आलिया, अर्जुन-मलायका, टायगर-दिशा अशा अनेक जोड्या आहेत ज्या या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा आहे. चाहत्यांनाही हे सेलिब्रेटी कधी लग्न करतील याची उत्सुकता आहे. हे सेलिब्रेटी खूप मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी कधी लग्न करतोय हे स्पष्ट केलं नाही. पण या वर्षी ते लग्नाच्या बेडीत अडकतील असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येतंय.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे कधी आपल्या रिलेशनशीपबद्दल जास्त बोलत नाहीत. परंतु अनेक ठिकाणी हे एकत्रच वावरतात.
तारा सुतारिया आणि आधार जैन हे लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे. तारा ही नेहमी अनेक कार्यक्रमात आधारच्या परिवारासोबत दिसून येते.
बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल हे रिलेशनशीपमध्ये आहेत अशी चर्चा आहे. परंतु ते कधी लग्न करणार हे अद्याप स्पष्ट नाही.
रिचा चढ्ढा आणि फजल अली यांनी गेल्या वर्षीच लग्न करण्याचं ठरवलं होतं. परंतु कोरोनामुळे त्यांनी आपलं लग्न पुढं ढकललं. आता या वर्षी ते लग्न करतील अशी दाट शक्यता आहे.
फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. ते यंदा लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा आहे.
बॉलिवूडचे मोस्ट फेमस कपल म्हणून अर्जुन कपूर आणि मलायका आरोराला ओळखलं जातं. गेली अनेक वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांच्या लग्नाची अफवावी उठली जाते.