PHOTO : ब्लू फ्लेअर्ड ड्रेस, व्हाईट शूज; प्रेग्नन्सीमध्ये आलियाचा स्टायलिश लूक
अभिनेत्री आलिया भट लवकरच आई बनणार आहे. प्रेग्नन्सीमुळे आलिया तिच्या कपड्यांबाबत फारच सिलेक्टिव्ह झाली आहे. बेबी बम्प दिसू नये यासोबतच स्टायलिश कसं दिसावं, हे तिला चांगलं माहित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया भट सध्या आपल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेग्नन्सीमुळेही ती चर्चेत आहे. बेबी बम्पसोबत एलिगंट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी ती समजून उमजून कपडे निवडत आहे. तिचे काही फोटो समोर आले आहेत.
आलिया नुकतीच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊसला गेली होती. तेव्हा पॅपराझीने तिचे काही फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
यावेळी आलियाने ब्लू शॉर्ट फ्लेअर्ड ड्रेस आणि व्हाईट जॅकेट परिधान घातला आहे. तिने तिच्या आऊटफिटवर व्हाईट शूज घातले होते.
धर्मा प्रॉडक्शनच्या बाहेर आल्यानंतर आलिया भटने पॅपराझींना वेळ दिला अनेक फोटो क्लिक केले. नो मेकअप लूकमध्येही तिच्या चेहऱ्यावर ग्लो होता.
आलियाचा हा प्रेग्नंसी ग्लो आहे हे तर स्पष्ट आहे. चिमुकल्या बाळाच्या आगमनासाठी कपूर कुटुंबासोबतच तिचे चाहतेही आतुर आहेत.
आलिया प्रेग्नंट असल्याने पॅपराझी देखील फोटो क्लिक करताना थोडं अंतर राखून असतात.
आलिया भटची प्रेग्नंसी फॅशन सगळ्यांनाच आवडत आहे. याआधी ती रणबीर कपूरसोबत कलरफुल वनपीस परिधान केलेली दिसली होती.
लवकरच आलिया भट 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.