Parineeti Chopra Raghav Chadha: क्रिकेट, लिंबू-चमचा अन् संगीत खुर्ची; चड्ढा आणि चोप्रा कुटुंबानं खेळले भन्नाट गेम्स, परिणीती आणि राघव यांनी शेअर केले खास फोटो

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकतेच राघव आणि परिणीती यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

परिणीती आणि राघव यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चढ्ढा आणि चोप्रा कुटुंब हे विविध गेम्स खेळताना दिसत आहेत.
परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्याआधी चड्ढा आणि चोप्रा कुटुंबानं क्रिकेट , थ्री लेग रेस, लिंबू आणि चमचा, संगीत खुर्ची यांसारखे गेम्स खेळले.
परिणीती आणि राघव यांनी चड्ढा आणि चोप्रा यांच्यामधील झालेल्या मॅचचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
परिणीती आणि राघव यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये क्रिकेटर हरभजन सिंह देखील विविध गेम्स खेळताना दिसत आहे.
राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, आमच्या लग्नाआधीच्या “विधी” मध्ये संगीत खुर्ची, लिंबू आणि चमचा शर्यत, थ्री लेग रेस आणि क्रिकेट यासारखे खेळांचा समावेश होते.हे खरोखरच आनंददायी होते.
पुढे राघव यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, या खेळांमध्ये चड्ढा विजेते ठरले नसले तरी, आम्ही चोप्रांचे विशेषत: परीचे, जी आमच्या कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्य बनली आहे, यांचे मन नक्कीच जिंकले.
परिणीती चोप्रानं फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, हे केवळ जिंकणे किंवा हरणे याबद्दल नव्हते. हे खास आणि आनंदी क्षण, चीअर्स, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तयार झालेल्या बंधांसाठी होते.