Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 23-24 तारखेला उदयपूरमध्ये सोहळा
या जोडप्याच्या या दिमाखदार विवाह सोहळ्यात अनेक मोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी सहभागी होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह सप्टेंबर महिन्यातच पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थानची निवड केली आहे.
दरम्यान, लग्नाच्या तारखेबाबत दोघांनाही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव यांचा लग्न सोहळा 23-24 सप्टेंबरला पार पडणार आहे.
यामध्ये 23 सप्टेंबरला मेहेंदी, हळदी आणि संगीत यासह अनेक कार्यक्रम असतील. त्यानंतर 24 सप्टेंबरला लग्न होणार आहे.
राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये हा शानदार विवाह सोहळा पार पडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
परिणीती आणि राघव यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला होता आणि आता त्यांचं लग्न होणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
पंजाबमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असताना परिणीती राघव चड्ढा यांना पहिल्यांदा भेटली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं