PHOTO : फॅशन फेस ऑफ! नोरा, मलायका की, सोनाक्षी; हाय स्लिट गाऊनमध्ये कोणाचा जलवा?
बॉलिवूड आणि फॅशन म्हणजे, समीकरणंच... आपल्या ट्रेंडी फॅशनसाठी बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच ओळखल्या जातात. अनेकदा या अभिनेत्री आपल्या लूकनं फॅशन जगतात नवा ट्रेंड सेट करतात. तर अनेकदा या अभिनेत्रींमध्येच फॅशन फेस ऑफ पाहायला मिळतो. अशातच सध्या या बॉलिवूडच्या बाला एकापेक्षा एक हाय स्लिट गाऊन वेअर करताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिलबर गर्ल नोरा फतेही या फोटोमध्ये रेड कलरच्या सीक्वेन गाऊन ड्रेसमध्य सुंदर दिसत आहे. नोराच्या या स्टायलिश अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.
मलायका अरोरा नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पीच कलरच्या या सीक्वेन हाय स्लिट गाऊनमध्ये क्लासी पोझ देत आहे.
करीना कपूरने मरुन कलरचा हाय स्लिट गाऊन कॅरी केला आहे. बेबोचा हा अंदाज सर्वांनाच आवडला आहे.
तारा सुतारियने काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंट दरम्यान व्हाईट सीक्वेन हाय स्लिट गाऊन वेअर केला होता. तारा सुतारियाने ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरीही कॅरी केली होती.
सोनाक्षी सिन्हा आपल्या स्टायलिंगसाठी ओळखली जाते. सोनाक्षी सिन्हाने पॅरेट कलरचा सीक्वेन हाय स्लिट गाऊन ड्रेस वेअर केला होता. याचे फोटो तिने इंस्टाग्रावर शेअर केले होते.
भूमी पेडणेकर आपला क्लासी अंदाज आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. भूमी पेडणेकरने सिल्वर रंगाचा हाय स्लिट गाऊन वेअर केला आहे.
जान्हवी कपूर म्हणजे, बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री. जान्हवी या फोटोमध्ये ब्लॅक हाय स्लिट गाऊनमध्ये दिसतेय.