'या' अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय गायक जुबिन नौटियालचं नाव, जाणून घ्या कोण आहे?

अभिनेत्री निकिता दत्ता (Nikita Dutta) आणि गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. निकिता आणि झुबिनच्या डेटिंगच्या चर्चाही एकेकाळी इंटरनेटवर गाजल्या होत्या पण दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निकिता दत्ता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. निकिताने 2012 मध्ये फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता. तिने मिस इंडिया स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

निकिता दत्ताने 'हम दीवाना दिल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचा निर्माता सैफ अली खान होता. चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही, यामुळेच अभिनेत्रीला प्रसिद्धीही मिळवता आली नाही.
निकिता दत्ताने पुन्हा टीव्ही इंडस्ट्रीत नशीब आजमावले. 'ड्रीम गर्ल' या मालिकेतून अभिनेत्रीने पदार्पण केले. हा शो हिट झाल्यानंतर तीने अनेक शोमध्ये झळकली.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हिट झाल्यानंतर निकिता पुन्हा एकदा 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये परतली. निकिताने गोल्ड चित्रपटात झळकली यावेळी ती चर्चेत आली.
'कबीर सिंग' आणि 'द बिग बुल' या चित्रपटांमध्ये निकिता दत्ताने पुन्हा तिच्या अभिनय कौशल्य दाखवलं. चित्रपटांसोबतच निकिता दत्ता तिच्या स्टायलिश स्टाइलसाठीही खूप प्रसिद्धी मिळवते.
निकिता दत्ता नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता निकिता दत्ताचे नाव गायक जुबिन नौटियालसोबत जोडले जात आहे. निकीता किंवा जुबिनकडून त्यांच्या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.