Neha Dhupia Becomes Mother : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया पुन्हा झाली 'आई'
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. तिने आज एका मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी तिचा पती अंगद बेदी याने चाहत्यांना दिली आहे. याआधी देखील तिने एका मुलाला जन्म दिला होता.(Photo:@nehadhupia/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहा आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. आनंदाची बातमी कळताच नेहा, अंगद आणि नेहाचा पहिला मुलगा मेहर प्रचंड खूश झाले आहेत. अंगदने नेहासोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्यात ती बेबी बंप करताना दिसून येत आहे. (Photo:@nehadhupia/IG)
नेहा धूपियाचे पहिले बाळंतपण प्रचंड चर्चेत होते. नेहाने लग्नाआधीच बाळाला जन्म दिल्याचे नेहाने स्वत: सांगितले होते. त्यामुळे नेहा आणि अंगदला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. (Photo:@nehadhupia/IG)
काही कालावधीआधी नेहा सनक नावाच्या तिच्या आगामी चित्रपटाचे डबिंग करताना दिसून आली होती. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बेहजाद खंबाटा यांनी केले आहे. (Photo:@nehadhupia/IG)
'सनक' चित्रपट हा अनेक काल्पनिक घटनांवर आधारलेला आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात नेहा धूपियासोबत विद्यूत जामवाल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.(Photo:@nehadhupia/IG)