Nargis Fakhri: नर्गिस फाखरीचा लेदर स्कर्ट ऑलिव्ह ट्यूबटॉप लूक व्हायरल
अभिनय, नृत्य , फॅशन स्पॉटच्या विविध छटामध्ये आपली जादू दाखवणारी नर्गिस फाखरी हिने नुकतंच एका दिमाखदार अवॉर्ड सोहळ्यात को होस्टिंग केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच दिल्लीत कॉस्मो इंडियन ब्लॉगर अवॉर्ड सोहळा संपन्न झाला आणि नर्गिसने गुरफतेह पिरजादासोबत या सोहळ्यात खास सूत्रसंचालन केलं.
यावेळी नर्गिसच्या आऊटफिटबद्दल चर्चा झाल्या कारण अनेकांचं लक्ष वेधून घेत नर्गिसने बॉडीफिट लेदर स्कर्टसह ऑलिव्ह ट्यूबटॉप असा खास पेहराव केला होता.
नर्गिसला आपण सगळ्यांनी शेवटचं पाहिलं ते अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या सोबत शिवशास्त्री बालबोआ मध्ये. प्रेक्षकांनी आणि चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं.
लॅक्मे फॅशन वॉकमध्ये तिच्या दिसण्याच्या आणि वॉकच्या खास चर्चा रंगल्या होत्या.
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने 2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
नर्गिसने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. अशा परिस्थितीत, नर्गिस तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.