Marathi Actors : नाना पाटेकर ते सिद्धार्थ जाधव; 'या' मराठी कलाकारांचं बॉलिवूडवर राज्य
नाना पाटेकर यांनी परींदा, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम अशा अनेक बॉलिवूडपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मिता पाटील यांनी 'चरणदास चोर' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
अशोक सराफ यांनी करण अर्जुन, सिंघम, कोयला, येस बॉस अशा अनेक हिंदी सिनेमांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रीमा लागू यांनी हम आपके है कोन, कुछ कूछ होता है, हम साथ साथ है, वास्तव या नावाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
सचिन खेडेकर यांनी तेरे नाम, अस्तित्व, झिद्दी या चित्रपटांपासून आताच्या सिंघम, रुस्तम यांसारख्या अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या.
श्रेयस तळपदेने इकबाल, गोलमाल सिरीज, ओम शांती ओम यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
सोनाली कुलकर्णीने दिल चाहता है, सिंघम, पोस्टर बॉईज यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
रेणुका शहाणेने आजवर अनेक हिंदी सिनेमांत काम केलं आहे. हम आपके है कोन हा सिनेमा चांगलाच गाजला आहे.
वर्षा उसजावकर यांनी 'इंसानियक की देवता' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सिद्धार्थ जाधवने गोलमाल, सिम्बा, सूर्यवंशी, राधे, सर्कस अशा बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.