26/11 Mumbai Terror Attack : 'तो काळा दिवस'; मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट
26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस हा मुंबईसाठी (Mumbai) काळा दिवस ठरला होता. या दिवशी पाकिस्तामधून आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला होता. आज त्या घटनेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 'मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला' या संकल्पनेवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार करण्यात आल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या आजही अंगावर शहारे येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेन (रँडी रायन) आणि त्याची पत्नी मीरा (रेबेका हेजलवुड) यांची कथा Embrace या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. बेन आणि मीरा हे मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पार्टीसाठी जातात. पण दहशतवादी हे ताज हॉटेलवर हल्ला करतात. यावेळी बेन आणि मीरा यांना कोणकोणत्या प्रसंगांना समोरे जावे लागते. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
वन लेस गॉड हा चित्रपट त्या परदेशी पर्यटकांवर आधारित आहे, जे दहशतवाद्यांच्या ताब्यात होते.या चित्रपटात सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11) ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली
मुंबई हल्ल्यावर आधारित पुस्तक 'मुंबई एवेंजर्स' च्या कथानकावर 'फॅन्टम' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली. या चित्रपटात सैफ अली खाननं प्रमुख भूमिका साकारली आहे.
मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी तसेच ही संपूर्ण घटना कशी घडली? हे 'द अटॅक ऑफ 26/11' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
ताज हॉटेलमध्ये झालेल्यामुळे हल्ल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले.
ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.