Body Positivity: 'कबीर सिंग'मध्ये झळकलेल्या मराठमोळ्या वनिताचा बोल्ड लूक
मराठी कला जगतात तिची विशेष ओळख आहे. आपल्याला या फोटोच्या आणि कौशल्याच्याच बळावर मुख्य अभिनेत्री म्हणून एखाद्या चित्रपटासाठी निवडल्यासच ही मोहिम खऱ्या अर्थानं यशस्वी ठरलेली असेल, असं वनिताचं म्हणणं आहे. तिच्या याच आत्मविश्वासाला दाद देत सर्व स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी 'एबीपी माझा'कडून खुप साऱ्या शुभेच्छा. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवनिता शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या चित्रपटातून एका छोटेखानी भूमिकेतून चर्चेत आली होती. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
इतकंच नव्हे, तर अनेकांनीच ही मोहीम पुढं सुरु ठेवण्याचा निर्धार करत तिच्या धाडसाची आणि आत्मविश्वासाची दादही दिली. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
वनितानं तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला कमालीची पसंती दर्शवली. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
वनितानं हा फोटो शेअर करत त्यासाठी खास कॅप्शनही लिहिलं आहे. 'माझ्या कौशल्यावर, जिद्दीवर, आत्मविश्वासावर आणि माझ्या शरीरावर मला गर्व आहे. कारण, मी .... मी आहे', असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलं. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत त्याबाबत मनात कोणताच संकोचलेपणा न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देत आहे. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अशा चळवळी आकारास येतात ज्या खऱ्या अर्थानं साचेबद्ध विचारसरणीला शह देतात. अशीच एक चळवळ सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ज्यामुळं 'कबीर सिंग' या बॉलिवूडपटात झळकलेली एक मराठमोळी अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकनं सर्वांचं लक्ष वेधत आहे. या फोटोच्या माध्यमातून ही अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात Body Positivity अर्थात शरीराकडे पाहण्याच्या सकारात्मक आणि तितक्याच समर्पक दृष्टीकोनाविषयी खूप काही सांगून जात आहे. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -