कोकणचो हापूस इलो! देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
टिकवलेल्या मोहोरामुळे आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांना देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केट मध्ये पाठवता आली. यातून त्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकलमांना आलेला मोहोर टिकवून मोहोरावर कीटकनाशकाच्या फवारण्या करून मोहोर टिकवण्यात त्यांना यश आले.
यावर्षी शंकर नाणेरकर पहिली देवगड हापूस आंबा वाशी मार्केटला रवाना करण्याचा मान मिळवला असून काल आंब्याच्या पेट्या पाठवण्यात आल्या आहेत.
शंकर नाणेरकर यांच्या कुणकेश्वर गावातील हापूस कलमांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मोहोर आला होता.
सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातून देवगड हापूस आंब्याच्या दोन पेट्या वाशी मार्केटला रवाना झाल्या आहेत.
कुणकेश्वर गावातील आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांच्या आमराईतुन दोन हापूस आंब्याच्या पेट्या मुंबई मार्केटला पाठविण्यात आल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -