एका जाहिरातीचे घेते 1.5 कोटी, लग्न न करताच दोन मुलींची आई; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
मिस युनिवर्स सुष्मिता सेननं 1996 मध्ये दस्तक चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. सुष्मिता सेन शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा, अमिताभ बच्च, सनी देओल यांसारख्या स्टार्ससोबत काम करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुष्मिता सेन कोट्यवधींची मालकिण आहे. GQ report रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनचं नेटवर्थ 95 कोटींचं आहे. सुष्मिता फिल्म, अॅड्स, ब्रँड एंडोर्समेंटमार्फत मोठी कमाई करते.
सुष्मिता 1.5 कोटी ब्रँड एंडोर्समेंटमधून कमावते. याव्यतिरिक्त 3 के 4 कोटी रुपये एका फिल्मसाठी चार्ज करते. सुष्मिताचं मुंबई, वर्सोवामध्ये एक घरही आहे.
याव्यतिरिक्त सुष्मिताकडे एकापेक्षा एक अशा अनेक लग्झरी कारदेखील आहे. तिच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये BMW 7 सीरीज 730Ld, लेक्सस LX 470, BMW X6, Fiat Linea आणि ऑडी Q7 यांसारख्या गाड्या आहेत.
सुष्मिता सेन 48 वर्षांच्या आहे आणि तिनं आजवर लग्न केलेलं नाही. सुष्मितानं रेने आणि अलीशा या दोन मुलींचं पालकत्व स्विकारलं आहे. सुष्मितानं दोन्ही मुलींना दत्तक घेतलं आहे.
सुष्मिताचं मॉडल रोहमन शॉलसोबत अफेअर सुरू होतं. दोघांचं अफेअर अनेक वर्ष सुरू होत, पण नंतर सुष्मितानं ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं.
आता पुन्हा सुष्मिताला रोहमनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. ज्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. दरम्यान, सुष्मितानं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.