Mirzapur 3 Kaviraj Rahim : शायरीने धमाल उडवली, छोट्या भूमिकेतही छाप सोडली; 'मिर्झापूर-3' मधील कविराज रहीम आहे तरी कोण?
मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये एक कविमनाची व्यक्ती दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीला प्रसिद्ध कवी व्हायचे आहे. रहीमची कविता वाचण्याची शैली इतकी मजेदार आहे की ती सर्वांनाच आवडते आणि ते अगदी मनापासून खरे असल्याचेही दाखवण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरहीम आपल्या कवितेत शिव्यांची पेरणी करतो. पण, या शिव्या ऐकून लोकांना हसू फुटते.
कविराज रहीमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव पल्लव सिंग आहे. मिर्झापूरपूर्वीही त्याने काही वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
'मिर्झापूर सीझन 3' पूर्वी, त्याने 'माई' आणि 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड'मध्ये काम केले.
पल्लवने इंजिनीअरिंग केले आहे. दिल्लीतील 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.
पल्लव केवळ अभिनेताच नाही तर लेखकही आहे
पल्लव सिंहने अनेक नाटकांसाठी लेखनही केले आहे. त्याशिवाय रंगभूमीवरही त्याने काम केले आहे.