Chhaya Kadam : छाया कदम आता नवी जबाबदारी पार पाडणार, करणार सिनेनिर्मितीत पदार्पण!
दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी विविध चित्रपटात आपली छाप सोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता.
अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम आता कारकिर्दीत नवी जबाबदारी पार पाडणार आहेत. छाया कदम या सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरत आहे.
'बारदोवी' या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'बारदोवी' या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे.
मित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत.
करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलेले आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे हे आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत.
चित्रपटाच्या पोस्टरवर शाल पांघरून करारी नजरेनं पाहणारी स्त्री दिसते. ही भूमिका छाया कदम यांनी साकारली आहेत.
छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे
छाया यांची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टरवरून व्यक्त केला जात आहे.
छाया कदम यांची मुख्य भूमिका आणि त्यांची पहिलीच सहनिर्मिती असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (pc:chhaya.kadam.75/ig)