Shweta Shinde : 'मेरा वाला पिंक'... श्वेता शिंदेने शेअर केले स्विमसूटमधील जबरदस्त फोटो
मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही तिने पिंक स्विम सूटमधील फोटो शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल होत आहेत.
या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.
चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.