In Pics : Highest Paid Actors : 'या' कलाकारांची फी ऐकून थक्क व्हाल!
सिनेविश्वातील ग्लॅमर आणि झगमगाट अनेक तरुण-तरुणींना आकर्षित करतो. इतकंच नाही तर इथे मिळणारी फी देखील अनेकांना भुरळ पाडले. सिनेविश्वात प्रसिद्ध झालेले अनेक कलाकार आपल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या जोरावर जबरदस्त पैसा कमावात. त्यांची फी देखील तेवढीच तगडी असते. प्रभासपासून आलिया भट आणि दीपिका पादुकोण यांसारखे कलाकार एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात. जाणून घेऊया हे कलाकार किती फी घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोणचा समावेशही इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रीमध्ये होते. दीपिकाने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी निश्चित केली आहे. तर पती रणवीर सिंहसोबतच्या '83' या चित्रपटासाठी तिने 14 कोटी रुपये आकारले आहेत.
'मास्टर'च्या जबरदस्त यशाचा प्रमुख शिल्पकार असलेला तामिळ चित्रपटातील सुपरस्टार थलापती विजयचे चाहते कमी नाहीत. चित्रपटांमधील कमाईवरुन त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू समजू शकते. विजयने एका चित्रपटासाठी तब्बल शंभर कोटी रुपये फी घेतल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फॅन फॉलोईंग आणि ब्रॅण्ड व्हॅल्यू सगळ्यांनाच माहित आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत. अक्षय कुमार म्हणजे हिट चित्रपट असं समीकरण झालं आहे. त्यामुळेच तो देखील एका चित्रपटसाठी तगडी रक्कम आकारतो. काही वृत्तानुसार अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल 117 कोटी रुपये फी निश्चित केली आहे.
बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूबद्दल कोणाच्याही मनात शंका नसेल. चाहत्यांमध्ये प्रभासची जबरदस्त क्रेझ आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीपासून बॉलिवूडमधला आवडता हिरो आहेत. वृत्तानुसार प्रभास एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपयांची फी आकारतो.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवलेली अभिने आलिया भट देखील इंडस्ट्रीमधली महागडी अभिनेत्री आहे. आलिया लवकरच बाहुबलीचा दिग्दर्शक एसएस राजामौलीचा चित्रपट 'आरआरआर'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी आलियाने 50 लाख रुपये प्रतिदिवसच्या हिशेबाने फी घेतली आहे. म्हणजेच अशाप्रकारने आलियाने एका चित्रपटासाठी सुमारे 20 ते 22 कोटी रुपये घेतले आहेत.