लाइफ इज ब्युटीफुल ते द इंटर्न; आयुष्याचा खरा अर्थ सांगणारे 'हे' चित्रपट नक्की बघा
1997 मध्ये रिलीज झालेला लाइफ इज ब्युटीफुल हा चित्रपट एका अशा कुटुंबावर आधारित आहे, जे आयुष्यात कितीही संकटं आली तरीही त्याला हसत सामोरे जात असतं. हा चित्रपट आलेल्या संटकाला आनंदानं कसं समोरं जायचं, हे शिकवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2015 मध्ये रिलीज झालेला द इंटर्न या चित्रपटात अभिनेता रॉबर्ट डी निरो आणि अभिनेत्री ऍन हॅथवेनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
माणूस त्याच्या आयुष्यात नेहमी काहीना काही शिकत असतो, हा संदेश द इंटर्न या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
3 इंडियट्स या 2009 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती.
केवळ पुस्तकी ज्ञान असून काहीही होत नाही, प्रॅक्टिकल ज्ञान देखील असायला पाहिजे, हे या चित्रपटामधून शिकायला मिळतं.
आयुष्य हे किती असेल? याचा विचार करण्यापेक्षा ते कसं जगायचं? याचा विचार करावा हा संदेश सुशांत सिंह राजपूजचा दिल बेचारा हा चित्रपट देतो.
डिप्रेशनचा सामना अनेक जण करतात पण अशातच मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत बोलून आपलं दु:ख मांडून मन मोकळं करणं किती महत्वाचं आहे, हे छिछोरे या चित्रपटात दाखवलं आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.
'हर पल यहाँ दी भर जियो, जो है समाँ कल हो न हो' आयुष्याचा खरा अर्थ सांगणारे हे गाणे कल हो न हो या चित्रपटात आहे. आपण किती वर्षे जगणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहित नाही. म्हणून रोजचा दिवस हा आनंदानं जगा, असा संदेश या गाण्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.