Koffee with Karan Season 8: 'कॉफी विथ करण'मध्ये करणनं सांगितला 'तो' किस्सा; म्हणाला, 'मी तेव्हा खूप रडलो'

कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोचा आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कॉफी विथ करणच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीरनं हजेरी लावली.

कॉफी विथ करण-8 च्या पहिल्या एपिसोडमध्ये करणनं दीपिका आणि रणवीरला एक किस्सा सांगितला.
करण जोहरने सांगितले की, तो नैराश्याचा सामना करत होता.
NMACC लाँचदरम्यान मला एंग्जायटी अटॅक आला होता, असंही करणनं सांगितलं.
'त्या दिवशी मला समजले की, मला डिप्रेशन आहे. त्यावेळी माझ्यासोबत वरुण धवन होता. तो लगेच माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून विचारले की मी ठीक आहे का?' असंही करणनं सांगितलं.
पुढे करणनं सांगितलं, 'मला तेव्हा खूप घाम आला होता.त्यावेळी मी जोरात श्वास घेत होतो. अर्ध्या तासाने मी घरी गेलो. मी माझ्या खोलीत पोहोचताच खूप रडलो. मी का रडत आहे? हे मला समजत नाही.
करणनं सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर दीपिका आणि रणवीर देखील शॉक झाले.
मी माझ्या काऊन्सिलरकडे गेलो आणि त्यांना माझी समस्या सांगितली. मी त्याला सांगितले की माझा चित्रपट येणार आहे. त्यानंतर त्यांनी मला ध्यान करण्यास सांगितले. असंही करणनं सांगितलं.
करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.