Peanust Health Benefits : टाईमपास म्हणून खाल्लेले शेंगदाणे देतात आरोग्याला अनेक फायदे
तुम्ही ट्रेनने, बसने प्रवास करताना अनेकजण आपल्या अवतीभोवती टाईमपास म्हणून शेंगदाणे खाताना अगदी सहज दिसतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेंगदाण्याचा टाईमपास म्हणून जरी चघळण्यासाठी वापर केला जात असला तरी मात्र शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे आढळतात.
हिवाळ्यात बे-टाईम अन्न खाल्ल्याने अॅसिडिटी सुरू होते. अशावेळी रोज रात्री मूठभर शेंगदाणे भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर खा. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होते.
टाईप टू डायबिटीजने ग्रस्त असलेले लोक शेंगदाणे खाऊ शकतात. शेंगदाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे सेवन करून त्वचेला कोरडेपणापासून वाचवता येते.
शेंगदाण्यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि फायबर आढळतात जे थंडीत हाडे मजबूत करतात. यामध्ये आढळणारी नैसर्गिक चरबी आरोग्य, त्वचा आणि केसांसाठीही चांगली मानली जाते.
शेंगदाणे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतात. विशेष म्हणजे शेंगदाणे तुम्ही भाजून, भिजवून किंवा त्याची भाजी करूनदेखील तुम्ही खाऊ शकता.
शेंगदाणे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका. तसेच दूध, आईस्क्रीम आणि आंबट फळे खाल्ल्यानंतर त्याचे सेवन करू नये. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेंगदाणे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.