संगीता बिजलानीसोबत सलमान खानची लग्नपत्रिका छापली होती, मग लग्न का नाही झाले?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. 55 वर्षीय सलमानने बॉलिवूडमधील बर्याच अभिनेत्रींना डेट केले आहे. पण त्याचं कोणाशीच लग्न झालं नाही. संगीता बिजलानी अशी एक अभिनेत्री आहे, जिच्यासोबत सलमान खानची लग्नपत्रिका छापली गेली होती. पण, त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीडिया रिपोर्टनुसार संगीता सलमानची दुसरी गर्लफ्रेंड होती. दोघे जीममध्ये भेटले. यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यावेळी सलमान खूप तरुण होता आणि तो इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करत होता. तर दुसरीकडे चित्रपटसृष्टीत संगीताचे नाव होते. संगीता सलमानपेक्षा 5 वर्ष मोठी होती.

दोघेही त्यांच्याबद्दल सीरियस होते. म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही घरातील सदस्यांना सांगितले आणि कोणालाही याबद्दल आक्षेप नव्हता. लग्नपत्रिकाही छापल्या आणि लग्नाची तारीखही जवळ आली होती.
सलमान खानने केलेल्या फसवणुकीमुळे ती दु:खी होऊन सोमी अली मियामीला परत आली आणि 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सलमानने ऐश्वर्या रायसोबत ब्रेकअपही केला.
सलमानने दिलेल्या धोक्यामुळे संगीताला मोठा धक्का बसला होता. परंतु, त्यानंतर तिने 1996 मध्ये भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. ती अझरची दुसरी पत्नी बनली. दुसरीकडे, सलमानने सोमी अलीला जवळपास 8 वर्षे डेट केलं. पण, नंतर तिला सोडून ऐश्वर्यासोबत जुळवले.