Madhuri Dixit Love Life: जेव्हा बॉलिवूडची 'धक धक गर्ल' पडली क्रिकेटरच्या प्रेमात, का राहिली प्रेमकहाणी अधुरी? पाहा...
माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळेच 90च्या दशकात सगळेच माधुरीचे दिवाने झाले होते. क्रिकेटर अजय जडेजा देखील त्यापैकीच एक होता आणि विशेष म्हणजे माधुरीलाही अजय आवडू लागला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर अजय आणि माधुरीची भेट एका मॅगझिनच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या भेटीतच दोघेही चांगले मित्र बनले. त्यानंतर दोघांमधील भेटीगाठी वाढू लागल्या. अनेकवेळा दोघे एकत्र स्पॉट होऊ लागले.
एवढेच नाही, तर दोघांची जवळीक इतकी वाढली होती की दोघांनी एकाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. पण अजयच्या घरच्यांनी माधुरीला नापसंत केल्याने त्यांच्या प्रेमात अडचण निर्माण झाली.
यानंतर अजय आणि माधुरीमधील अंतर वाढू लागले आणि या जोडप्याची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली. त्यानंतर अजयपासून दूर गेल्यावर माधुरीने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं. अवघ्या करिअरच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
आजही अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलीवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी सतत जोडलेली असते.