Bollywood: लग्नानंतर कियारा अडवाणी नव्हे, तर सिद्धार्थ मल्होत्रा बनवतो जेवण; अभिनेत्रीने केला 'हा' मजेशीर खुलासा
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कियाराने लग्नानंतर काहीही काम केलं नाही. ती फक्त बसून खाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्य दिनानिमित्त कियारा अडवाणी ने NDTV च्या 'जवान' कार्यक्रमात भाग घेतला होता. तिथे अभिनेत्रीने जवानांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तरं दिली.
एका जवानाने अभिनेत्रीला विचारलं, 'लग्नानंतर स्वयंपाकघरात बनवलेली पहिली रेसिपी कोणती?' यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं की, 'आजपर्यंत मी किचनमध्ये काहीही केलं नाही, फक्त पाणी गरम केलं असेल'.
यानंतर, अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याचं, म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्राचं कौतुक केलं आणि तो खूप चांगला कुक असल्याचं सांगितलं.
सिद्धार्थ मल्होत्राला जेवण बनवण्याची आवड असल्याचं कियारा म्हणाली.
कियारा म्हणाली की, मी नशीबवान आहे, कारण माझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला आवडतं, त्यामुळे तो स्वतःसाठी काहीतरी बनवत असतो आणि मी ते खाते.
सिद्धार्थ मल्होत्रा खूप चांगली भाकरी बनवतो, असा खुलासा देखील कियाराने केला. जरी भाकरी करणं कठीण असलं तरी सिद्धार्थ खूप चांगली भाकरी बनवतो, असं कियारा म्हणाली.
कियाराच्या सासूला कियारा खूप आवडते, असंही तिने सांगितलं.
कियारा आणि सिडचं लग्न याच वर्षी 7 फेब्रुवारीला झालं. दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात गोड जोडप्यांपैकी एक आहेत.
राजस्थानच्या शाही महालात दोघांचं लग्न पार पडलं होतं.