Katrina Kaif Royal Jewellery : नाकात नथनी, गळ्यात हिरेजडित हार; नववधू कतरिनाचा 'महाराणी' साज
Katrina Kaif Royal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आपली लग्नगाठ बांधली आहे. रात्री उशीरा कतरिना-विकीनं आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांच्या या फोटोंना काही मिनिटांतच शेकडो लाईक्स आणि कमेंट्स आल्या. कतरिनाचा नववधू साज सर्वांनाच खूप आवडला. कतरिनाच्या शाही लूकची चर्चा सगळीकडेच पाहायला मिळाली. कतरिनाच्या लेहंग्यासोबतच तिची ज्वेलरीही चर्चेचा विषय ठरली. (Photo : @katrinakaif/ Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना कैफनं मटका सिल्कमधील लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. ज्यावर फाइन टिल्ला वर्क आणि जरदोसीनं भरतकाम केलं होतं. तिच्या ओढणी आणि साडीवर सोन्या-चांदीच्या धाग्यानं हॅन्डवर्क केलं होतं. (Photo : @katrinakaif/ Instagram)
कतरिनानं लग्नात वेअर केलेल्या दागिन्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. सब्यासाचीच्या ऑफिशिअर पेजवर कतरिनानं लग्नाच्या वेळी परिधान केलेल्या लेहंग्याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कतरिनानं लग्नात 22 कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेला अनकट हिऱ्यांचा हार वेअर केला होता. (Photo : @katrinakaif/ Instagram)
कतरिना कैफनं आपल्या गळ्यात हिरेजडित चोकर वेअर केला होता. कतरिनाचा नववधू साज एखाद्या महाराणीप्रमाणेच दिसत होता. कतरिनाने आपल्या नाकात नथनीही वेअर केली होती. (Photo : @katrinakaif/ Instagram)
कतरिनाने कपाळावर कुंदनानं जडलेली माथा पट्टी वेअर केली होती. त्यासोबत तिनं आपल्या कानांमध्ये सोन्याचे झुमकेही घातले होते. (Photo : @katrinakaif/ Instagram)
कतरिना कैफनं वेअर केलेल्या ज्वेलरीमध्ये डायमंड आणि सफायरनं तयार करण्यात आलेल्या रिंग्सही होत्या. (Photo : @katrinakaif/ Instagram)
नववधू कतरिनानं हातात कुंदनानं जडलेली दोन मोठी कडी घातली होती. कतरिनानं यावेळी कलीरे आणि मंगळसूत्रही खास होतं. तिच्या हातातील कलीरे हार्ट शेपमध्ये डिझाईन करण्यात आल्या होत्या. (Photo : @katrinakaif/ Instagram)
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वेडिंग लूकनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. (Photo : @katrinakaif/ Instagram)