कार्तिक आर्यननं घेतलं आलिशान घर; जाणून घ्या किंमत
अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
सध्या कार्तिक हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कार्तिकनं मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात...
कार्तिक आर्यनने जुहू येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका रिपोर्टनुसार, 17.50 कोटी रुपयांना हे घर कार्तिकनं खरेदी केलं आहे.
कार्तिक आर्यनने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असणारा शाहिद कपूरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.या फ्लॅटचा एरिया 3 हजार 681 स्क्वेअर फूट होता. कार्तिक या घराचे भाडे 7.5 लाख रुपये देत होता.
2019 मध्ये कार्तिकने वर्सोव्यातील यारी रोडवरील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 1.60 कोटी रुपयांना एक घर विकत घेतले होते.
कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण सध्या कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.