Karisma Kapoor: अॅक्टिंगसाठी कॉलेज सोडलं, नवऱ्यासाठी अॅक्टिंग सोडली, शेवटी नवऱ्यालाच सोडलं; कपूर घराण्याची कन्या जगतेय असं जीवन
करिश्मा कपूरच्या बॉलिवूडमधील यशस्वी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या ती अभिनयापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात.
करिश्मा कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 'प्रेम कैदी' चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. यासाठी अभिनेत्रीने तिचे शिक्षण अर्धवट सोडले होते.
बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या करिश्मा कपूरने राजा बाबू, कुली नंबर 1, साजन चले ससुराल, हीरो नंबर 1, बीवी नंबर 1, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ-साथ हैं, दिल यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. दिल तो पागल है, जिगर आणि अनाडी मध्ये काम केले आहे.
जेव्हा अभिनेत्रीची कारकीर्द शिखरावर होती, तेव्हा तिची संजय कपूरशी भेट झाली आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने अभिनयाला अलविदा केला. पण तेव्हा करिश्माला माहित नव्हते की हा निर्णय तिला आयुष्यभर वेदना देणार आहे.
खरंतर लग्नानंतर लगेचच संजय आणि करिश्माच्या जीवनामध्ये तणाव निर्माण झाला होता. करिश्माने ते बराच काळ सहन केले. मग एके दिवशी तिने संजयला घटस्फोट घेऊन त्याच्यापासून वेगळे व्हायचे ठरवले.
जेव्हा त्यांच्या घटस्फोटाची बाब समोर आली तेव्हा करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील भयानक रहस्येही समोर आली. करिश्माने संजय कपूरवर मारहाण आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. ही बातमी ऐकून सगळेच थक्क झाले.
आता संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत आनंदी आणि लॅव्हिश आयुष्य जगत आहे. जरी करिश्मा कपूर अजूनही अभिनयापासून दूर आहे, तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि बॉलिवूडच्या प्रत्येक फंक्शनमध्ये ती स्पॉट होते.