In Pics | कपिल शर्माचे जुने फोटो व्हायरल, ओळखणेही कठीण
कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही स्क्रीनवरील लोकप्रिय चेहरा आहे. कपिलची फॅन्स भारतातच नाही तर जगभरात आहेत. कपिल शर्मा आज ज्या उंचीवर आहे तिथे तो मेहनत आणि अनेक अडचणींचा सामना करुन पोहोचला आहे. कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही जुने फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोमध्ये कपिलला ओळखणे सुद्धा कठीण आहे. जळवपास 28 वर्ष जुना फोटो कपिलने शेअर केला आहे. फोटो कपिलचा भाऊ अशोकही दिसत आहे.
कपिल शर्मा सर्वसामान्य कुटुंबातून आहे. कपिलचे वडील पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होते. तर आई गृहिणी होती.
कपिल 'कॉमेडी सर्कस'मध्ये वारंवार विजेता बनला. या विजयानंतर कपिलच्या करिअरने भरारी घेतली. कॉमेडीमध्ये ठसा उमटवल्यानंतर कपिलने स्वत:चा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' हा शो लाँच केला.
कपिल आधी पंजाबी कॉमेडी शो 'हसते रहो' दिसला होता. त्यानंतर कपिलने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' साठी ऑडिशन दिले. ज्यामध्ये त्याला रिजेक्ट करण्यात आलं. पण कपिलने कधीही हार मानली नाही आणि पुन्हा एकदा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' शोमध्ये ऑडिशन दिले आणि यावेळी त्यांची निवड झाली. कपिल त्याच सीझनचा विजेता होता.
कपिल शर्मा हे नाव आज देशातील जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. कपिल शर्माने कॉमेडियन म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मात्र कपिलचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. कपिलने थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आणि कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अर्धवेळ थिएटर शिकवायचा.