Kangana Ranaut : बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होत नाही : कंगना रनौत
बॉयकॉट ट्रेंडबद्दल बोलताना कंगना म्हणाली,देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यातील एक टक्के लोक सोशल मीडियावर आहेत आणि त्यातील खूप कमी लोक बॉयकॉट ट्रेंड सुरू करणारे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होतो, असं मला वाटत नाही, असं कंगना रनौत म्हणाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अनेक मंडळी सेलिब्रिटी झाले असून ते कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. मी तरी सोशल मीडियाचा कामापुरता वापर करते, असं वक्तव्य कंगनाने केलं आहे.
कंगना रनौत म्हणाली,मी कोणत्या व्यक्तीची बाजू घेत नाही. माझं नुकसान होत असलं तरी देशाचा विचार करुन एखाद्या गोष्टीवर मी व्यक्त होत असते. माझं मत अनेकांना खटकतं.
माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे, असं कंगना म्हणाली.
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत कधी सिनेमांमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चत असते.
कंगना रनौत म्हणाली,बालपणीपासूनच मी खूप जिद्दी आहे. अनेक अभिनेत्रींना एक-दोन वर्षात यश मिळतं. पण मला लोकप्रिय झाल्यानंतर यशस्वी व्हायला आठ ते नऊ वर्षे लागली आहेत.
मुंबईबद्दलच्या आकर्षणाबद्दल कंगना म्हणाली,मुंबई या शहराचं मला सुरुवातीपासूनच एक आकर्षण होतं.
सिनेप्रवासाबद्दल बोलताना कंगना रनौत म्हणाली,सिनेमे करण्याचं, अभिनेत्री व्हायचं असं माझं कधीच स्वप्न नव्हतं.
धाकड गर्ल कंगना रनौतचा सिनेप्रवास सोपा नव्हता.