मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, 'कसाटा खाण्याची इच्छा होती, तर...'
त्या अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरच्या नावाचाही समावेश होतो. जो तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकसाठी जास्त चर्चेत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलिकडेच, अभिनेत्रीनं तिच्या नव्या फोटोशूटमधील काही मनमोहक फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पुन्हा एकदा तिची साडी फ्लाँट करताना दिसली.
जान्हवी कपूरनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पारंपरिक लूकचे हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. जो काही वेळातच व्हायरल होऊ लागले.
या फोटोंमध्ये जान्हवी मल्टीकलर एम्ब्रॉयडरी साडी नेसलेली दिसत आहे. या साडीत अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरनं आपला दिलकश लूक लाईट मेकअप, मोकळे केस आणि मिलियन डॉलर स्माईलसोबत पूर्ण केला आहे.
जान्हवीनं आपल्या साडीसोबतच गळ्यात एक चोकर नेकलेस वेअर केला आहे. ज्यामुळे तिचा लूक रॉयल लूक कम्प्लिट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
चाहत्यांकडून जान्हवीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेत्रीनं आपले फोटो शेअर करत एक खास कॅप्शनसुद्धा दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, कसाटा खाण्याची इच्छा होती, तर साडी नेसली...
जान्हवीचे हे फोटो पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीला सगळे ब्युटिफुल म्हणत आहे. तर कोणी साडी क्वीन म्हणत आहे.