International Yoga Day 2023: मलायका आरोरा ते अनुपम खेर; या सेलिब्रिटींनी खास पद्धतीनं दिल्या योगा दिनाच्या शुभेच्छा
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

International Yoga Day 2023
1/8
International Yoga Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ता बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2/8
मलायका अरोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन योगाचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले - 'हे माझे विचार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.'
3/8
मलायकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगा करण्याचे फायदे लिहिले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
4/8
अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत.
5/8
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर देखील योगा करते. योग दिनानिमित्त तिनं योगा करतानाचा एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8
बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाहने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आणि लिहिले - वही शून्य है, वही इकाई.
7/8
अभिनेत्री ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर योगा करतानाचा एक फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8/8
करीना कपूर खाननेही सैफ अली खान आणि तिच्या मुलांचे फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 21 Jun 2023 02:45 PM (IST)