सवाई माधोपुरमधील या किल्यात लग्न करणार आहेत विकी-कतरिना, फोटो आले समोर
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. मागील दोन महिन्यापासून विकी-कतरिना यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं होतं. अखेर चर्चेवरून पडदा उठला असून 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे.
सवाई माधोपुरमधील बरवाड़ा किल्यामध्ये दोघांचा शाही विवाह होणार आहे.
शाही विवाहासाठी बरवाडाला खास सजवण्यात आलं आहे.
7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
10 डिसेंबरला रिसेप्शनने या उत्सवाची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत.
कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे.
तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. (फोटो: मानव मंगलानी)