In Pics : नव्या वर्षात 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
बधाई दो : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा 'बधाई दो' हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ 28.33 कोटींची कमाई केली. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंगूबाई काठियावाडी : 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. 25 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती.
झुंड : नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चनचा 'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला.
राधे श्याम : 'राधे श्याम' सिनेमात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे बजेट 300-350 कोटी होती. आतापर्यंत या सिनेमाने 212.76 कोटींची कमाई केली आहे.
द कश्मीर फाइल्स : काश्मिरी पंडितांवर आधारित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. विवेक अग्निहोत्रीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करेल.
बच्चन पांडे : अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा सिनेमा 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने आतापर्यंत केवळ 38.25 कोटींची कमाई केली आहे.
आरआरआर : एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 18 कोटींची कमाई केली आहे.