In Pics : बॉलिवूडमध्ये लगीन घाई! आलिया-रणबीरनंतर बॉलिवूडचे 'हे' लव्ह बर्ड्स अडकणार लग्नबंधनात
अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं असतं. पुढील वर्षात त्यांचं लग्न होऊ शकतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने त्यांचं नातं अधिकृत केल्यानंतर चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी बॉलिवूडच्या चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक आहेत. अद्याप त्यांनी त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ते गेल्या अनेक दिवसांत एकमेकांना डेट करत आहे. पुढील वर्षात ते लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे.
आदर जैन आणि तारा सुतारियाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांनी त्यांच्या नात्यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता तारा कधी लग्नच्या बेडीत अडकणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. सोशल मीडियावर ते त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तापसी पन्नू बॅटमिंटन खेळाडू मॅथियाससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृतरित्या माहिती दिली नसली तरी ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
आलिया-रणबीर अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ मागील वर्षात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.