Real life Princess | सोहा अली खान ते सागरिका... राजघराण्यातून बॉलिवूडमध्ये आलेल्या राजकन्या
सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींना एखाद्या राणींचं आयुष्य जगताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र बॉलिवूडमधील काही अभिनेत्री खऱ्या राजघराण्यातून येतात. म्हणजे त्या रिअल लाईफ प्रिन्सेस आहेत असं सुद्धा म्हणता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजन्नत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सोनल चौहान उत्तर प्रदेशच्या राजघराण्यातील आहे. ती खऱ्या आयुष्यातही खूप शाही आयुष्य जगते. राजघराण्यातील असूनही सोनलने बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
चक दे इंडिया सिनेमात झळकलेली आणि भारतीय स्टार गोलंदाज जहीर खानची पत्नी सागरिका घाटगे देखील राजकन्याच आहे. सागरिका कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घराण्याशी संबंधित आहे. सागरिका विजयसिंह घाटगे यांची कन्या आहे.
अदिती राव हैदरी देखील राजकुमारी आहे. तिचे आजोबा रामेश्वर राव वानपार्थी राज्याचे नेते होते. तर त्यांचे आजोबा मुहम्मद सालेह अकबर हैदरी होते.
बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवलेल्या रिया सेन आणि रायमा सेन या रिअल लाईफ प्रिन्सेस आहेत. त्याचे आई-वडील दोघेही राजघराण्यातून येतात. त्यांची आजी इला देवी कूच बिहारची राजकन्या होती. ज्या जयपूरच्या महाराणी गाययत्री देवी यांच्या मोठ्या भगिनी आहेत.
अभिनेत्री अलिशा खानला बॉलिवूडमध्ये फारशी कमाल करता आली नाही, मात्र त्यांच्या पूर्वजांच्या नावे एक पूर्ण शहर होतं. मोहम्मद नवाब गाजियाउद्दीन खान या घराण्याशी त्यांचा संबंध आहे. गाजियाबाद शहराचं नाव त्यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.
सलमान खानसोबत मैने प्यार किया सिनेमातून एका रात्रीत सुपरस्टार बनलेली अभिनेत्री भाग्यश्री देखील खऱ्या आयुष्यात एक राणी आहे. भाग्यश्रीचे वडील सांगलीतील राजघराण्याचे वारस आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची पत्नी किरण राव देखील राजकन्या आहे. किरण राव देखील अदिती राव हैदरी प्रमाणे तेलंगणाच्या वानापार्थी घराण्याशी संबंधित आहे. अदिती आणि किरण चुलत बहिणी आहेत.
सोहा अली खानचा जन्म नवाब कुटुंबात झाला आहे. तिचे वडील मन्सूर अली खान पटौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. 1952 ते 1971 या काळात ते पतौडीचे नवाब होते. सोहाचे आजोबा इफ्तिखार अली खान हे आठ पतौडी नवाब होते. त्यांची आजी साजिदा सुल्तान भोपाळची बेगम होती. यामुळेच वास्तविक जीवनात सोहा देखील एक राजकुमारी आहे.