Solapur Weekend Lockdown | सोलापुरात आजपासून वीकेंड लॉकडाऊन, सर्व दुकानं शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहणार
सोलापूर लॉकडाऊन
1/10
सोलापूर जिल्ह्यात आजपासून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
2/10
आठवड्यातील शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
3/10
शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा असणार आहे
4/10
जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार देखील बंद राहणार आहेत.
5/10
सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील.
6/10
सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल.
7/10
हा वीकेंड लॉकडाऊन केवळ अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानांसाठी लागू असणार आहे.
8/10
नागरिकांसाठी अगोदर जारी केलेल्या आदेशानुसार केवळ रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.
9/10
त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
10/10
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत.
Published at : 27 Mar 2021 09:44 AM (IST)