Hemangi Kavi: 'मन धागा धागा’ मालिकेच्या सेटवर हेमांगी कवीला झाली दुखापत; फोटो केला शेअर
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेमांगी ही वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.
नुकतीच हेमांगीनं एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिला झालेल्या दुखापतीबाबत सांगितलं.
हेमांगीला ‘मन धागा धागा’ या मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे. हेमांगीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात.'
'Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं.कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले. काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता.' असंही हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.
पुढे हेमांगीनं पोस्ट लिहिलं, 'पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली. प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं. मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. Theatre ला पोचले.'
'Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते. मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली?' असंही हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.
हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.