Happy Birthday Suman Kalyanpur : सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवास कसा झाला? जाणून घ्या सुमन कल्याणपूर यांचा प्रवास...
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचा आज वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी संगीतक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सुमन यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुमन कल्याणपूर यांनी मराठीसह, गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भवानीपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला.
मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग.दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली.
सुमन यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपट गीतांवर भावगीतेही गायली आहेत.
सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळेच झाले.
एका कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला.
त्यांनंतर त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांनी सुमनताईंना विचारणा केली. सुमन कल्याणपूर यांनी देखील होकार दिला.
गझल, ठुमरी, भक्तीगीते यात सुमन यांना जास्त गोडी होती.