Happy Birthday Shveta Salve : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींची इमेज ब्रेक करणारी श्वेता साळवे; बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत
अभिनेत्री श्वेता साळवे आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असताना ती नृत्य आणि नाटकांच्या सपर्धेत भाग घ्यायची.
श्वेता साळवेने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ‘लेफ्ट राइट लेफ्ट’या कार्यक्रमामुळे तिला लोकप्रियता मिळाली.
श्वेता साळवेचा जन्म 12 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. त्यानंतर सोफिया महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
श्वेताला अभिनयासोबत नृत्याचीदेखील आवड आहे. तिने 1998 साली छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
श्वेताने 1998 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेद्वारे मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती.
श्वेताने ‘सीआईडी,’ ‘पर इस दिल को कैसे समझाऊं,’ ‘सरकार,’ ‘थोड़ी सी जमीन थोड़ा सा आसमान,’ ‘कहीं किसी रोज’ सारख्या गाजलेल्या मालिकांत काम केलं आहे. या मालिकांमुळे ती घराघरांत पोहोचली.
श्वेता साळवे 2012 साली हरमीत सेठीसोबत लग्नबंधनात अडकली. तर 2016 साली तिने एका मुलीला जन्म दिला.
श्वेता साळवेने ग्लॅमरस स्टाईलने छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींची प्रतिमा बदलली आहे.
श्वेताने 1999 साली ‘प्यार में कभी कभी कभी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.