एक नंबर.... संपूर्ण गावाला मिळतेय गरम पाणी, भंडाऱ्यातील ग्रामपंचायतीचा उपक्रम
सरपणासाठी वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी, सोबतच जंगलात होणारा वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरपणासाठी वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी, सोबतच जंगलात होणारा वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे.
सरपणासाठी वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी, सोबतच जंगलात होणारा वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे.
सरपणासाठी वृक्षांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी, सोबतच जंगलात होणारा वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे.
किंबहुना त्यातून लाखोंची पुरस्कार राशी ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. त्यातीलच स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या राशीतून ग्रामपंचायतीने 120 कुटुंबासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही गरम पाण्याची व्यवस्था केली असून उर्वरितांसाठी लवकरच गरम पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ग्रामपंचायतने सौर ऊर्जेद्वारे चालनारा वॉटर हीटर बसवला असून यातून सकाळी 6 वाजतापासून 4 तास दररोज गरमागरम पाणी ग्रामस्थांना आंघोळीसाठी मोफत वितरित केल्या जात आहे.
ग्रामीण भागात जलाऊ लाकडच्या सहाय्याने चालणाऱ्या चुलीवर पाणी गरम केले जात असे. मात्र, आता चक्क ग्रामपंचायतने गरम पाण्याची व्यवस्था केल्याने ग्रामस्थ विशेषत: महिलांची लाकड़े तोड़ण्याची मेहनत कमी झाली आहे.
त्यामुळे रेंगेपार कोहळी ग्रामपंचायतीचा मोफ़त पाणी देण्याचा निर्णय जणू कडकदार थंडीत उबदार निर्णय ठरला आहे. शिवाय पैशाची बचत होऊन गावातील कुटुंबाचा विचार केल्यास चुलीवर पाणी गरम करण्यासाठी वर्षाला 1 हजार टन लाकडाची गरज भासते.
यासाठी वर्षाला होणारी सुमारे 500 वृक्षाची कत्तल होत होती. मात्र, आता गावात मोफत गरम पाणी मिळत असल्याने वृक्ष तोड थांबणार असल्याने पर्यावरण अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
ग्रामस्थांच्या एकोप्याने गावाने मोठी भरारी घेतली आहे.