Happy Birthday Renuka Shahane : करिअरप्रमाणे लव्हस्टोरीदेखील फिल्मी; जाणून घ्या रेणुका शहाणेंच्या खास गोष्टी...
मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतदेखील आपला दबदबा कायम ठेवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'हम आपके हैं कोन' या सिनेमाच्या माध्यमातून रेणुकाला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
रेणुकाला 1994 साली 'अबोली' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला आहे.
रेणुका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. परखड मतं मांडत असल्याने रेणुका चर्चेत असते.
रेणुकाच्या करिअरप्रमाणे तिची लव्हस्टोरीदेखील फिल्मी आहे. रेणुका आशुतोष राणासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
हंसल मेहताच्या एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रेणुका आणि आशुतोषची भेट झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
आशुतोषने रेणुकासाठी खास कविता सादर करत प्रेमाची कबुली दिली होती.
रेणुका आणि आशुतोष 2001 साली लग्नबंधनात अडकले आहेत.
रेणुकाचं आशुतोषआधी दिग्दर्शक, नाट्यलेखक विजय केंकरेंसोबत लग्न झालं होतं.
'हाच सूनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून रेणुकाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.