Happy Birthday Amruta Khanvilkar : बर्थडे गर्ल अमृता खानविलकरविषयी जाणून घ्या...
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनटखट नखऱ्याची नार 'चंद्रा' म्हणून अमृता ओळखली जाते.
अमृताने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांत तिने काम केलं आहे.
मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले.
रवी जाधवच्या 'नटरंग' या बहुचर्चित सिनेमातील 'वाजले की बारा' या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
अमृताने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रम केले आहेत.